इंडीयाच्या विकासा साठी भारताचा त्याग
इंडियाच्या विकासासाठी भारताचा त्याग का? तरंग।शिवाजी घाडगे देशाचा विकास हा प्रत्येक नागरिकाचा अभिमानाचा विषय असतो. आधुनिक महामार्ग, बुलेट ट्रेन, मोठी धरणे, औद्योगिक प्रकल्प, बंदरे, विमानतळ आणि स्मार्ट शहरे ही प्रगतीची प्रतीके मानली जातात. परंतु या विकासाच्या चमकदार चित्रामागे एक मूलभूत प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो या विकासाची किंमत नेमकी कोण मोजत आहे? ग्रामीण आणि शहरी म्हणजे शहराचा विकासा साठी त्याग कोण करतय? चार, सहा किंवा दहा पदरी महामार्ग उभे राहताना हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जाते. बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. धरणांसाठी संपूर्ण गावे पाण्याखाली जातात. औष्णिक वीज प्रकल्पांसाठी जंगलांचा बळी दिला जातो आणि आदिवासींना त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडावे लागते. किनारपट्टीवरील प्रकल्पांसाठी मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते. प्रत्येक वेळी एकच युक्तिवाद पुढे केला जातो देशाच्या विकासासाठी काही ना काही त्याग करावाच लागतो. हा युक्तिवाद चुकीचा नाही. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीस...