Posts

Showing posts with the label माती व पाणी

शेती साठी पाणी व्यवस्थापन महत्वाचे-डाॅ पवार

Image
पाण्याचे योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता  - अधिष्ठाता  डॉ. दिलीप पवार पाण्या शिवाय शेती होऊच शकत नाही  जमिनीच्या पोतनुसार त्यामधील पाण्याची उपलब्धता ठरत असून आपल्या भागातील जमिनीच्या प्रकाराचा उपयोग करुन घेवून आपल्याला माती व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. उपलब्ध असलेली जमीन व पाणी हे सुरक्षीत राहण्यासाठी व त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी चॅप्टर इंडियन सोसायटी ऑफ सॉईल सायन्स, मृदविज्ञान विभागाच्या वतीने जागतीक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार बोलत होते. माती आणि पाणी जीवनाचा स्त्रोत या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राहुरी तालुक्यातील खडांबे येथील प्रगतशील शेतकरी कृषिभूषण  सुरसिंग पवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मृदविज्...