Posts

Showing posts with the label चालकांच्या मुलाला ही केले आमदार

तामिळनाडूचे खरे नायक विजय थलापती

Image
 तामिळनाडूचा निकाल… राजकारणाला नवा दिशादर्शक राजरंग।शिवाजी घाडगे  तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता नेते विजय थलापती यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या राजकीय घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद देत, नव्या चेहऱ्याने आणि नव्या आश्वासनांनी मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता या निकालातून दिसून आली. हा निकाल केवळ सत्तांतराचा नसून, जनतेच्या अपेक्षांमध्ये होत असलेल्या बदलांचा संकेत मानावा लागेल. या निवडणुकीत लोकाभिमुख योजनांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. महिलांसाठी मासिक आर्थिक मदत, बेरोजगारांसाठी भत्ता, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, तसेच सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना या सगळ्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. या योजनांमुळे केवळ आश्वासनांची यादी नव्हे, तर “सरकार आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष मदत करू शकते” हा संदेश पोहोचवण्यात यश आले. याहून महत्त्वाची बाब म्हणजे, विजय यांनी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासह संविधानिक मूल्यांचा उल्लेख करत दिलेला संदेश. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन त्याला आमदार बनवणे ही कृती प...