Posts

Showing posts with the label शेततळे

शेती सिंचन साठी शेततळे हवे करा अर्ज

Image
 शेतकरयांना शेततळे हवे  मग करा अर्ज  ‘मागेल त्याला वैयक्तीक शेततळे’उत्पन्नाची हमी देणारी महत्त्वाकांक्षी योजना ! अशी आहे पात्रता... शाश्वत सिंचनासाठी कृषी विभागामार्फत ‘मागेल त्या शेतकरयांला शेततळे योजना’   राबविली जाते आहे. या योजनेत काहीसा कालानुरूप बदल झाला असून आता या योजनेला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना म्हणून ओळखले जाते. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते. शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीचा विचार करता शेततळे खोदण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून वैयक्तिक शेततळ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. लाभार्थी पात्रता - अर्जदार शेतकऱ्यांकडे - स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. शेतकऱ्याची जम...