खासदार कोण आज पास नापास
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. 37-अहमदनगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आहे. मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर 38-शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.3 मध्ये होणार आहे. एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल ३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात 222-शेवगाव पाथर्डी, 223-राहुरी, 224-पारनेर, 225-अहमदनगर शहर, 226-श्रीगोंदा व 227-कर्जत जामखेड असे सह विधानसभा मतदारस...