दिव्यांगाचे वेदना जाणून सहकार्य करा आमदार बच्चु कडु
दिव्यांगांच्या जीवनातील दु:ख, वेदना धडधाकड माणसाने जानुन घ्याव्यात - आमदार बच्चु कडु दूर करण्यासाठी प्रशासनाने - जीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अत्यंत आत्मविश्वासाने दिव्यांग जीवन जगत असुन त्यांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. दिव्यांगांना आवश्यक असलेल्या लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करायला हवे केडगाव येथील निशा लॉन्स येथे 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे आदीं उपस्थित होते. आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले दिव्यांगांच्या कल्याणासाठी आपण गेली 15 वर्षापासून सातत्याने काम करत आहे. जीवन जग...