शेतीची ढासाळती अर्थव्यवस्था मजुरांचा ताण
शेतीची ढासळलेली अर्थव्यवस्था : वाढता उत्पादन खर्च, मजुरीचा ताण भाष्य।शिवाजी घाडगे एकेकाळी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस शेतीने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले. ऊस उत्पादक म्हणजे सधन बागायतदार, अशी समाजात ओळख निर्माण झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांत बदललेल्या आर्थिक समीकरणांमुळे हे चित्र झपाट्याने बदलले आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे वाढलेले दर, रासायनिक खते व बियाण्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, बाजारातील अनिश्चितता आणि शेतमालाला न मिळणारा रास्त भाव यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतीपासून दूर जात भुसार पिकांकडे मोर्चा वळविला. मात्र, तेथेही अपेक्षित आर्थिक समाधान मिळत नसल्याने शेती आज तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढत आहे. ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक आहे. लागवडीपासून तोडणीपर्यंत साधारण वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. या काळात खत, औषधे, पाणी, मजुरी आणि इतर खर्च सातत्याने वाढत जातो. दुसरीकडे अनेक ठिकाणी उसाच्या वजनातील कथित अनियमितता, तोडणीसाठी लागणारा मोठा खर्च, वाहतूक, बांधणी साहित्या...