बेकायदेशीर ड्रोनविरोधात कारवाई करा
बेकायदेशीर ड्रोनविरोधात कारवाईची मागणी.. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. राहुरी। राहुरी तालुका व परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस आणि पत्रकार शिवाजी घाडगे यांनी मंगळवार दि. २६ मे रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची संयुक्तरित्या भेट घेऊन अवैध ड्रोनच्या वाढत्या हालचालींबाबत गंभीर चिंता व्यक्त करून कारवाईची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळाने राहुरी तालुक्यात अलीकडे रात्री अपरात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगितले. काही भागांमध्ये चोरीच्या घटनांपूर्वी ड्रोन दिसल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, या प्रक...