Posts

Showing posts with the label बोटे .... बिळात...

भोगू बाबा खरातला पोसणारे कोण आणखी कितीजणाचे बोटे बिळात?

Image
भोगू बाबां कॅप्टन अशोक खरात पोसणारे कोण कितीजणाचे बोटे बिळात? श्रद्धेचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिकमधील तथाकथित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असली, तरी या प्रकरणाकडे केवळ एखाद्या व्यक्तीच्या विकृत कृत्यांपुरते मर्यादित पाहणे ही मोठी चूक ठरेल. “साप, साप” म्हणून भुई बडवण्यात काही अर्थ नाही; कारण इथे प्रश्न केवळ एका ‘सापाचा’ नाही, तर त्याला पोसणाऱ्या आणि त्याच्या विषारी अस्तित्वाला बळ देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचा आहे.  या प्रकरणात केवळ “साप, साप” म्हणून भुई बडवून काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. खरातला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोसणारे, त्याला संरक्षण देणारे आणि त्याच्या प्रभावाला खतपाणी घालणारे नेमके कोण, हा खरा प्रश्न आहे. त्याने उभारलेली संपत्ती, निर्माण केलेला प्रभाव आणि त्याच्या संपर्कात आलेल्या महिलांची ओळख उघड होऊ नये योग्यच मात्र हे संगळे प्रकरण सहमतीने होते असे नाही त्याने श्रध्देचा गैर फायदा घेतला आहे   अशीच सर्वांची मानसिकता दिसून येते. परंतु या सर्वामागे त्याने ‘भानामती’च्या खेळातून अनेका...