Posts

Showing posts with the label 20 जुन पासुन

विभागीय कृषी संशोधन बैठक पुण्यात सुरु

Image
पुणे येथे खरीप हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न कृषि विद्यापीठे हे ज्ञानाचे स्रोत - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील महात्मा फुले कृषि विद्यापीठ स्थापन झाल्यापासून विद्यापीठाने  294 वाण,  1774 कृषी तंत्रज्ञान शिफारशी व 46 सुधारित अवजारे  प्रसारित केली आहे. मागच्या वर्षी विद्यापीठाने  चार वाण, 69 शिफारशी व तीन सुधारित अवजारे  प्रसारित केले आहे. विद्यापीठे ज्ञानाचा स्रोत आहे आणि हे ज्ञान कृषि विभागामार्फत विस्तारित केले जाते. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग हे शेतकऱ्यांसाठी  कायम कार्यशील आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कामधेनु सभागृह, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप-2023 च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृष...