पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केले तुरी चे लोकार्पण
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेहस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तुरीचा फुले पल्लवी आणि चारधारी वालाचा फुले श्रावणी या वाणांचे शेतकर्यांसाठी लोकार्पण @ शिवाजी घाडगे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला तुरीचा वाण फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) आणि क्षमता असणार्या पिकावरील संशोधन प्रकल्पाने विकसीत केलेला चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यु.बी. 17-18)पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला. नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या (पुसा) प्रक्षेत्रावर पंतप्रधानाच्या हस्ते हे लोकार्पण झाले. हवामानाला अनुकुल, योग्य उत्पादन देणारे, किड व रोगांना कमी बळी पडणारे आणि जैवसंवर्धनयुक्त वाण विकसीत करण्यावर संशोधनाचा भर असावा असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी 61 पिकांच्या 109 वाणांचे लोकार्पण करण्यात आले. यामघ्ये 34 शेतपिकांचा आणि 72 बागायती उद्यानविद्या पिकांचा सामावेश आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु. डॉ. पी.जी. पाटील ...