आमदार शिवाजी कार्डिले यांना आवडली राहुरी अण राहुरीला कार्डिले
आमदार शिवाजी कर्डिलेंना आवडली राहुरी अण राहुरीला कार्डिले ...! रविवार विशेष घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे अलिकडेच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मी राहुरी सोडणार नाही मतदार संघाची पुर्णर रचना होणार आहे आणि मी तीकडे जाणार आहे अशा वावड्या कोणी तरी उठवत आहे तेव्हा मी कोठेही जाणार नाही असे एका कार्यक्रमात ठणकावून सागितले आमदार शिवाजी कर्डिले हे नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे वास्तव्यास आहेत म्हणजे राहुरीत नाही असे असताना देखील ते राहुरी विधानसंभा मतदार संघात आमदार म्हणून तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत म्हणजे आमदार झाले आहेत तसे त्याचे शिक्षण देखील अल्प मात्र माणुसकी शाळेचे ते हेडमास्तर आहेत मागील वेळेस माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडुन आले पहिले अडीच वर्ष ते राज्य मंत्रिमंडळात देखील होते अचानक शिवसेनेचा एक गट बरोबर घेत माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पन्नास आमदार बरोबर घेऊन भाजपाला जाऊन मिळाले व मुख्यमंत्री झाले नंतर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार घेऊन गेले म्हणजे दोन मातब्बर पक्ष भाजपाने केद्रीय नेतृत्वाच...