देवळाली प्रवरा मराठी व उर्दु शाळेच्या वतीनी पुरस्कार
प्रशासकीय गौरव पुरस्कार सुदर्शन जवक यांना तर सुप्रिया आंबेकर,असिफ शेख यांना शिक्षक गौरव पुरस्कार जाहिर मराठी व उर्दु शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने दिले जाणारे गौरव पुरस्कार देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी व उर्दु शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रशासकीय गौरव पुरस्कार देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक यांना तर मराठी शाळेतील शिक्षिका सुप्रिया आंबेकर व उर्दु शाळेतील शिक्षक असिफ शेख यांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जाहिर करण्यात आले. देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी व उर्दु शाळेत एकञित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड विनोद शेटे हे होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा शोभा मोरे, माजी अध्यक्ष सुनिल...