Posts

Showing posts with the label जिल्हा बॅक निवडणूक

नगरचे आजी माजी खासदार सिल्व्हर ओकवर

Image
माझी  खासदार सदाशिव लोखंडे आणि खासदार निलेश लंके   सिल्व्हर ओकवर  राहुरी।  राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदेसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी खा शरद पवार यांची भेट घेतली. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांचा या भेटीशी संबंध असल्याचे बोलले जात असले, तरी या राजकीय भेटीमागे आणखी काही समीकरणे दडली आहेत का, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या ताकदीची आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाची परीक्षा मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षांतील नेत्यां...

विश्वासात न घेतल्याची नाराजी पण विश्वासाचे राजकारण कुठे?

Image
विश्वासात न घेतल्याची नाराजी; पण विश्वासाचे राजकारण कुठे? भाष्य।शिवाजी घाडगे  ‘मिले सूर मेरा, तुम्हारा तो...’ म्हणत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे सूर जुळवण्याचा प्रयत्न सुरू असताना प्रत्येक नेत्याला आपला सूर महत्त्वाचा वाटत आहे. मात्र सहकाराच्या राजकारणात ‘मला विचारले का नाही?’ या प्रश्नापेक्षा ‘सर्वांना सोबत घेऊन निर्णय झाला का?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सध्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीला विरोध नाही, मात्र सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाला पाहिजे, असा सूर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार नीलेश लंके यांच्यानंतर आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही लावला आहे. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना खासदार वाकचौरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, संगमनेर येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेला डावलण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्र...