वरखडे व कणसे एम पी के व्ही चे ऑयडाॅल
नितीन वरखडे व स्वप्निल कणसे हे आहेत जून महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. जून महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन नितीन वरखडे व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन स्वप्निल कणसे यांची निवड झालेली आहे. नितीन वरखडे हे मु. वरखडवाडी, पो. भोगाव, ता.वाई, जि. सातारा येथील शेतकरी असून कृषि पदवीधर श्री. स्वप्निल कणसे हे मु.पो. इंदापूर, जि. पुणे येथील कृषि उद्योजक आहेत. शेतकरी आयडॉल नितीन वरखडे यांनी शेती निगडीत व्यवसायाबरोबर शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांनी राज्यातील रब्बी ज्वारी (फुले रेवती) पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच कोल्हापूर विभागात भात (इंद्रायणी) पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून उसाचे एकरी 110 टन उत्पादन ते घेत आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जीवाणू खतांचा वापर शेतीमध्ये करुन इतर शेतकर्यांमध्ये त्याचा प्रसार केला आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. ...