Posts

Showing posts with the label आकाश दुबया हत्ते निषेधार्थ मोर्चा

गुंडगिरीचा वाढता विळखा श्रीरामपूरात नागरिकांचा आक्रोश

Image
गुंडगिरीचा वाढता विळखा आणि श्रीरामपूरचा आक्रोश स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  शहराची खरी ओळख त्याच्या उद्योगधंद्याने, व्यापाराने, संस्कृतीने आणि कायदा-सुव्यवस्थेने ठरते. नागरिक निर्भयपणे व्यवसाय करतात, कुटुंबासह रात्री फिरू शकतात आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते, तेव्हा त्या शहराची प्रगती होते. पण जेव्हा भरदिवसा व्यापाऱ्याचा निर्घृण खून होतो, त्यानंतर सलग चार दिवस शहर बंद राहते, सर्वपक्षीय मोर्चे निघतात आणि नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न पडतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीच्या हत्येचा विषय राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवरील अविश्वासाचा उद्रेक ठरतो. श्रीरामपूरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती ही याच वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. सलग चार दिवस शहर बंद राहिले. ही घटना केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून नागरिकांच्या मनात साचलेल्या असुरक्षिततेची अभिव्यक्ती आहे. व्यापाऱ्याचा जीव सुरक्षित नसेल तर शहरातील व्यापार किती दिवस टिकणार? उद्योजक गुंतवण...