विचारांचे उत्तर विचारांनीच...
विचारांना उत्तर विचारांनीच… एका मेका गच्चाडू अवघी फेकू शाई रणसंग्राम।शिवाजी घाडगे लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कधी राजकीय मंचावरून व्यक्त होतो, तर कधी सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर भाष्य करताना समोर येतो. मात्र, मतभेदांचा सामना करताना संयम, संवाद आणि विवेक या मूल्यांची जपणूक होणे तेवढेच आवश्यक असते. अलीकडे विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक अथवा काळे वंगण फेकल्याची घटना ही केवळ एका व्यक्तीवरील प्रतिक्रिया नसून समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक मानावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी ह भ प संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. मात्र, ही केवळ शाईफेक नसून काळे वंगण अंगावर ओतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदाय, काही कीर्तनकार आणि धार्मिक प्रवचनांच्या देवघेव पद्धतीबाबत भाष्य केले होते. काही महाराजांच...