Posts

Showing posts with the label 53 जणांना लाभ

गोपीनाथ मुंडे आपघात विमा लाभ

 गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत ५३ प्रस्ताव मंजूर विमा न भरता शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत विमा योजनेचा लाभ घेण्याचे संगमनेर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतर्गंत कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात २०२२ मध्ये ५३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर २०२३ मधील ३९ प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.  कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात संगमनेर, अकोले, कोपरगांव व राहाता या तालुक्यांचा समावेश होतो. शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरवतो, तर काही वेळा दिव्यांगत्व स्वीकारावे लागते. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी शासनाच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राबविली जाते.  या योजनेत २०२२ मध्ये संगमनेर -१९, अकोले -१२ , कोपरगांव – १० व राहाता -१२ असे एकूण ५३ प्रस्तावास मंजूरी मिळाली असून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयास विमा ...