शैक्षणिक समस्या सोडवु शिक्षण मंत्री दादा भुसे
प्राथमिक शिक्षकांच्या समस्यां टप्प्याटप्प्याने सोडवु -शिक्षणमंत्री दादा भुसे आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचेशी संवाद साधला.यावेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा टप्प्याटप्प्याने संपूर्णपणे निपटारा करणार असल्याचे स्पष्ट आश्वासन या संयुक्त बैठकीत दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली . जयहिंद कॉलेज,चर्चगेट(मुंबई) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री यांच्या समवेत राज्याचे शिक्षणसचिव रणजितसिंह देओल,शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह,एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी , शिक्षण उपसचिव तुषार महाजन ,माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदी प्रशासकीय अधिकारी यांचेसह अखिल संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , इष्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर,आबासाहेब लोंढे,आबासाहेब जगताप या बैठ...