शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक बच्छाव याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना उच्च न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! मुंबई । वृत्तसेवा राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सुमारे १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक विभागाचे तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने बच्छाव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, २६ जून २०१९ रोजी एका महिला शिक्षिकेच्या नावाने मूळ शालार्थ आयडी मंजुरीचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला होता. मात्र, याच मूळ आदेशात नंतर फेरफार करून अन्य १४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे बेकायदेशीररीत्या समाविष्ट करण्यात आली. पोलिसांनी गोळा केलेले साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या बनावट आदेशावर नितीन बच्छाव यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये स्वाक्षरी केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप आणि उपलब्ध प्रथमदर्शनी पुरावे लक्...