Posts

Showing posts with the label बिळातुन बळी...

भोदु अशोक खरात च्या कृत्याला देव ही घाबरला

Image
‘ बाबा’ अशोक खरातच्या कृत्याला देवही घाबरला? श्रद्धेचा बाजार — शिवाजी घाडगे सर्वसामान्य लोक देवाला घाबरून वाईट कृत्यांपासून दूर राहतात; मात्र ‘भोगू बाबा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांच्या कृत्यांमुळे आता नरबळीच्या संशयापर्यंत प्रकरण पोहोचल्याची चर्चा आहे. भक्तांना साप दाखवून भीती निर्माण करणारा, स्वतःला मोठा ‘शक्तीमान’ भासवणारा खरात याचे महिलांसोबतचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, आणखीही भयावह माहिती समोर येत असून, या सर्व प्रकरणाचा तपास एसआयटी नेमक्या कोणत्या पद्धतीने करते, यावरच खरात याची सर्व कृत्ये उघड होणार आहेत. कारण हा प्रश्न महिलांच्या अब्रूशी संबंधित आहे. नाशिक परिसरात स्वतःला ‘भोगू बाबा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात यांच्या कथित कृत्यांनी समाजमन हादरले असून, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. देव, धर्म आणि अध्यात्म यांच्या नावाखाली घडलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्यतः लोक वाईट कृत्य टाळण्यासाठी देवाची भीती बाळगतात; ...