डोक्यावर छत्री व्यावसायची खात्री
डोक्यावर छत्री व्यावसायची खात्री वास्तव।शिवाजी घाडगे छत्रीखालील वास्तव दुसऱ्या कोणार छत्री धरण्या पेक्षा आपल्यावर छत्री लावून आपण पिकवलेला टरबूज आपणच विक्री करु तेव्हा पिकवुया तसचे विकवुया हा नवा बदल देखील शेतकरी महिलांनी स्वीकारला याचे कौतुक व्हायला हवे! एका बाजूला बाबाबुवांच्या नावावर उभारले जाणारे आडंबर, त्यांच्या चरणी नतमस्तक होणारी गर्दी आणि त्यांच्यासाठी छत्री धरणारे भक्त; तर दुसऱ्या बाजूला उन्हाच्या कडक झळा सहन करत स्वतःवर छत्री लावून रस्त्यावर टरबूज विकणारी शेतकरी महिला ही दोन चित्रे आजच्या समाजातील तीव्र विरोधाभास अधोरेखित करतात. सध्या जागतिक घडामोडींमुळे शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत आहे. टरबूजासारख्या हंगामी पिकालाही योग्य भाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर आणून थेट विक्री करावी लागत आहे. या परिस्थितीत त्या महिलेचा फोटो केवळ एक दृश्य नाही, तर तो शेतीव्यवस्थेतील वास्तवाचा जिवंत दस्तऐवज आहे. या महिलेच्या कष्टात कोणताही दिखावा नाही, कोणतीही खोटी प्रतिष्ठा नाही. तिच्या घामाच्या प्र...