Posts

Showing posts with the label शनिशिगणापुर आले शनिवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहीले तेल

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहीले शनि वर तेल   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी   शनिशिंगणापूर येथे शनिवर तेल अर्पण करीत विधीवत अभिषेक केला  यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार शिवाजीराव कर्डीले उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे स्वागत    तत्पूर्वी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले.  जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तर शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे आमदार शिवाजी  कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी  त्यांचे स्वागत केले.