बेकायदेशीर ड्रोन प्रश्नी राहुरी पोलिसांचे दुर्लक्ष नागरिकांत संताप
बेकायदेशीर ड्रोनप्रश्नी राहुरी पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप, भीतीचे सावट ड्रोन।शिवाजी घाडगे राहुरी तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी रात्री उशिरापर्यंत घिरट्या घालणारे ड्रोन, वाढत्या चोरीच्या घटना, घरांचे दरवाजे ठोठावून दहशत निर्माण करणारे अज्ञात टोळके आणि त्याचवेळी स्थानिक पोलिसांची दिसणारी उदासीन भूमिका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा विषय केवळ अफवा किंवा सामान्य तक्रारींचा नसून थेट कायदा-सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्या काळोखात संशयास्पद ड्रोन फिरत असल्याचे अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हे ड्रोन केवळ मनोरंजनासाठी किंवा छायाचित्रणासाठी वापरले जात नसून, परिसराची पाहणी, घरांची रेकी किंवा गुन्हेगारी हालचालींसाठी त्यांचा वापर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी घरांचे दरवाजे वाजवणे, ...