कोठे नेवून ठेवली ही व्यवस्था?
कुठे नेऊन ठेवली आहे ही व्यवस्था? तरंग।शिवाजी घाडगे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बनत चालली आहे. शहरांतील अनेक सोसायट्यांमध्ये बारा-बारा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. मग ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला किती अंधार येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. एकीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा, तर दुसरीकडे पाणी आणि वीजटंचाईने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भविष्यातील भीषण पाणी संकटाची चाहूल आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असताना इंधन तुटवड्याची भीतीही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅस टंचाई इतकी तीव्र झाली आहे की काही मोठ्या हॉटेल्सनाही चुली पेटवण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे नव्हे, तर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत देणारी आहे. महागाईचा भडका इतका वाढला आहे की सामान्य माणसाच्या हाता...