लैंगिक अत्याचार जागा उपलब्ध करुन देणाऱ्या राहुरीच्या त्या दोन लाॅज वर कायदेशीर कारवाई
लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या त्या दोन लॉज चालकांवर कायदेशीर कारवाई बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो. परंतु याच कायद्यातील काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक अर्थात हॉटेलचा,लॉजचा मालक/ चालक,कॅफे चालक/ मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असते. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे...