Posts

Showing posts with the label लिग निदान गुन्हा

लिंग निदान चाचणी टाळा

Image
 पीसीपीएनडीटी कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ   जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्र तसेच रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विषयक विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप इंगळे, डॉ. फुंदे  आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी  सालीमठ म्हणाले की, स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात केंद्रांची अचानकपणे तपासणी करुन दोषी आढळणाऱ्या केंद्रावर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात यावी.  पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याबरोबरच वि...