भिंगार मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू
भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तणाव तरुणाचा मृत्यू शहर झाले शांत @शहर प्रतिनिधी अहिल्यानगर शहरातील भिंगार उपनगरात मध्यरात्री गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज नंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपक वागस्कर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या गंभीर घटनेनंतर संतापाची लाट उसळीली आहे संबंधित पोलिस अधिकाऱी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना गुलाल उधळण्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान दीपक वागस्कर यांना मारहाण झाल्याचा आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, दीपक वागस्कर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. उपलब्ध वृत्तांनुसार शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाठीचार्ज आणि मृत्यू यांच्यातील नेमका स...