Posts

Showing posts with the label संशोधन

फुले ऊसाचे वाण सरस कुलगुरु पाटील

Image
उसाचे फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 हे वाण अधिक सरस -कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील  देशातील उसाच्या क्षेत्रापैकी महाराष्ट्र राज्यात ऊसाचे 18 टक्के क्षेत्र असून 32 टक्के उत्पादन आहे. राज्यामध्ये 86 टक्के क्षेत्र हे पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांच्याखाली आहे. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे साखर कारखान्यांची, शेतकर्‍यांची आणि कृषि विद्यापीठाची शान आहे. या संशोधन केंद्रातून ऊसाचे आतापर्यंत 17 वाण आणि 110 शिफारशी प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत. या ऊसाच्या वाणांमुळेच साखर कारखाने सक्षमपणे सुरू आहेत आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली आहे. हे सर्व श्रेय ऊस वाण निर्मिती करणार्‍या शास्त्रज्ञांना जाते. ज्या राष्ट्रात शास्त्रज्ञांचा सन्मान होतो त्याच राष्ट्राची प्रगती वेगाने होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.        महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे नव्याने प्रसारीत झालेल्या ऊसाच्या सुधारीत वाणांची ता...

पिकपालट गरजेचे कुलगुरु डॉ पाटील

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न पिकांचे पिकपालट करणे गरजेचे - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या विभिन्न पिकांमुळे पिकांची फेरपालट होऊन जमिनीची प्रत सुधारते. त्यामुळे त्यापुढील हंगामात घेतल्या जाणार्या पिकांच्या उत्पादनात भर पडते. याबरोबर चांगल्या पद्धतीची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तसेच अनुकूल पर्यावरण तयार होण्यासाठी पिकांचे विविधकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक रब्बी व उन्हाळी-2024 चे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी संशोधन संचालक श्री. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि संचालक  रफिक नाईकवडी, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक  उमेश पा...

कृषी सहसंचालक यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठात भेट

Image
रफिक नाईकवाडी यांची आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर भेट   पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक  रफिक नाईकवाडी व अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर भेट दिली. यावेळी विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी विभागाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  नाईकवाडी यांनी केशर आंबा कलमे विक्री सुरु असलेल्या रोपवाटिकेस भेट देवून पाहणी केली व दर्जेदार केशर आंबा कलमे रोपे निर्मिती केल्याबद्दल कौतुक केले. प्रक्षेत्रावरील गांडूळ खत निर्मिती युनिट, व्हर्मी वॉश युनिटची उपयुक्तता जाणून घेतली. विभागाच्या प्रक्षेत्रावरील आधुनिक सिंचन उद्यानास भेट देवून तेथील ठिबक सिंचन, सूक्ष्म तुषार संच, तुषार संच, फॉगर्स, जेट्स, इत्यादी सिंचन प्रणालीचे विविध प्रकार रेनगन सिंचन शेती पंपाचे विविध प्रकार यांची माहिती घेतली. राष्ट्रीय कृषि विकास योजनेमार्फत या प्रक्षेत्रावर सौर ऊर्जेद्वारे चालणारी  सेन्ट्रल पिव्होट सि...

फुले पल्लवी तुरीचे नवीन वाण विकसीत

Image
तुरीचा नविन वाण फुले पल्लवी  प्रसारीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला मध्यम पक्वता कालावधी (155 ते 160 दिवस) असणारा तुर पिकाच्या फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) या वाणाला अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपुरद्वारा इक्रीसॅट हैदराबाद येथे दि. 27-29 मे, 2024 दरम्यान संपन्न झालेल्या वार्षिक संशोधन कार्यशाळेच्या बैठकित मान्यता देण्यात आली. फुले पल्लवी या वाणाची देशाच्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यात लागवडीकरीता शिफारस करण्यात आली आहे. या वाणाचे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 21.45 क्विंटल असुन दाणे टपोरे फिकट तपकिरी रंगाचे आहेत. 100 दाण्याचे वजन 11.0 गॅ्रम आहे. तुर पिकातील मर व वांझ या प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्प अव्वल

Image
कडधान्य सुधार प्रकल्पांतर्गत तुर व हरभरा संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन राहुरी- महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन प्रकल्पाअंतर्गत तूर व हरभरा योजनेला भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपुर यांचे पंचवार्षिक संशोधन आढावा अहवालानुसार उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या संस्थेचा पंचवार्षिक संशोधन आढावा अहवाल नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. कडधान्य सुधार प्रकल्पाकडे आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात तूर आणि रब्बी हंगामात हरभरा पीकावर संशोधनाचे कार्य चालते. कडधान्य सुधार प्रकल्पाची स्थापना सन 1973 साली झाली. सन 1982 साली आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. हरभरा पिकाचे मुख्य संशोधन केंद्र म्हणून 1994 साली तर तूर पिकाचे उपकेंद्र म्हणून 2002 साली आणि मुख्य केंद्र म्हणून 2015 मध्ये भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली. कडधान्य पिकांमध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, मटकी, चवळी, कुळथी आणि राजमा या पिकांच्या एकूण 49 वाणांची शिफ...

आय व्ही तंत्रज्ञान गिर कालवड जन्माला

Image
आय. व्ही. एफ तंत्रज्ञानातून झाला सहाव्या गिर कालवडीचा जन्म देशी गायींच्या उच्च वंशावळीचे जलदगतीने संवर्धनासाठी आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी  वापर करावा - अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानांचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा घेऊन आपल्या गोठयामध्ये उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण कराव्यात असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे कार्यरत आहे. या केंद्रामार्फत उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या संवर्धनासाठी आय.व्ही.एफ./भृण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठाचे  प्रक्षेत्र व शेतकर्‍यांच्या गोठयात राबविण्याचे काम सुरु आहे. राहुरीच्या गो संशोधन प्रकल्पावर या तंत्रज्ञानाने आजपर्यंत 6 गिर व 9 साहिवाल या देशी जातीच्या उच्च वंशावळीच्या कालवडी जन्माला आलेल्या आहेत. नुकत्याच जन्मलेल्या सहाव्या गिर कालवडीची पाहणी करताना अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे बोलत होते. य...