फुले पल्लवी तुरीचे नवीन वाण विकसीत

तुरीचा नविन वाण फुले पल्लवी  प्रसारीत

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला मध्यम पक्वता कालावधी (155 ते 160 दिवस) असणारा तुर पिकाच्या फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) या वाणाला अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपुरद्वारा इक्रीसॅट हैदराबाद येथे दि. 27-29 मे, 2024 दरम्यान संपन्न झालेल्या वार्षिक संशोधन कार्यशाळेच्या बैठकित मान्यता देण्यात आली. फुले पल्लवी या वाणाची देशाच्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यात लागवडीकरीता शिफारस करण्यात आली आहे. या वाणाचे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 21.45 क्विंटल असुन दाणे टपोरे फिकट तपकिरी रंगाचे आहेत. 100 दाण्याचे वजन 11.0 गॅ्रम आहे. तुर पिकातील मर व वांझ या प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) हा वाण विकसीत करण्यामध्ये पीक पैदासकार तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन.एस. कुटे, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. व्ही.एम. कुलकर्णी, तुर रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही.ए. चव्हाण आणि तुर किटकशास्त्रज्ञ डॉ. सी.बी. वायळ या शास्त्रज्ञांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार