ग्रंथउस्वोव जोरात सुरु
अहमदनगर ग्रंथोत्सवाचा थाटात शुभारंभ :- उच्च तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबाासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अहमदनगर ग्रंथोत्सवाचे उदघाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, प्रभारी ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, समिती सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, अहमदनगर जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, ज्येष्ठ साहित्यिक मेधाताई काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किशोर मरकड, अविनाश येवले, एन.बी. धुमाळ, छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक सुनील हुसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ग्रंथाचा प्रचार, प्रसार करण्याबरोबर वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी जिल्हा ग्रंथालयामार्फत आयोजित करण्यात आलेला ग्रंथोत्सव हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. नागरिकांनी अधिकाधिक ...