Posts

Showing posts from March, 2026

अंधश्रद्धेच्या आड वाढलेली गती शेवटी करी अधोगती

Image
अंधश्रद्धेच्या आड वाढलेली गती  शेवटी करी आधोगती  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  राज्यात सध्या गाजत असलेले तथाकथित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या फसवणुकीपुरते मर्यादित नसून, समाजातील अंधश्रद्धा, सत्ताधाऱ्यांशी असलेली साटेलोटे आणि प्रशासनातील संशयास्पद संबंध यांचे विदारक वास्तव उघड करणारे आहे. भविष्यकथन, अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या आडून उभारलेले हे कथित साम्राज्य आता कोसळण्याच्या मार्गावर आहे; मात्र या निमित्ताने अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध ही बाब अधिक चिंताजनक राज्यातील काही मंत्री आणि बड्या राजकीय नेत्यांच्या भविष्यकथनाच्या नावाखाली, तसेच महिलांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या तथाकथित ‘भोगू बाबा’ प्रकरणामुळे त्याच्या भक्तांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता पसरली आहे. शिर्डी परिसरात अलीकडेच तीन आयएएस अधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा रंगू लागली असून, या बैठकीमुळे प्रकरणाला अधिकच गूढ व गंभीर वळण मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहुरी येथे...

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक साठी भाजपाकडून अक्षय कर्डिले

Image
राहुरी पोटनिवडणूक : भाजपकडून अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारीची शक्यता ब्रेकिंग | घाडगे न्यूज राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची शक्यता प्रबळ असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. पक्षांतर्गत चर्चेनंतर त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळत असून, येत्या दोन दिवसांत पक्ष कार्यालयाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अक्षय कर्डिले यांच्यासह आणखी दोन इच्छुकांची अशी एकूण तीन नावे पक्षश्रेष्ठींकडे अंतिम निर्णयासाठी दिल्लीला पाठविल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असल्याचे समजते. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती असलेली सहानुभूती आणि स्थानिक राजकारणातील प्रभाव लक...

डोक्यावर छत्री पदाला कात्री

Image
डोक्यावर छत्री, पदाला कात्री  जबाबदारीची वेळ आता! श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिकमधील कथित ‘भोगू बाबा’ अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. अंधश्रद्धा, सत्तेची जवळीक आणि संस्थात्मक विश्वासार्हता यांचा धोकादायक संगम या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेला राजीनामा हा केवळ एक वैयक्तिक निर्णय नसून, तो सार्वजनिक जीवनातील नैतिक जबाबदारीचा मुद्दा ठरतो. अशोक खरात याच्यासोबतचे फोटो, त्याच्या ट्रस्टशी असलेले संबंध आणि त्याला मिळालेला अप्रत्यक्ष आधार—या सर्व बाबी गंभीर आहेत. महिला हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख व्यक्तीवरच अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होणे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळेच चाकणकर यांचा राजीनामा हा उशिरा का होईना, पण योग्य दिशेने उचललेले पाऊल म्हणावे लागेल. या प्रकरणात केवळ एक व्यक्ती किंवा एक संस्था जबाबदार नाही. अनेक राजकीय आणि सामाजिक स्तरांवर अशा भोंदू प्रवृत्तींना खतपाणी घालणारे वातावरण तयार झाले आहे. काही नेत्यांची छायाचित्रे समोर आली असली, तरी त्यांनी घेतलेली ‘मी नाही त...

राहुरी नगरपरिषेदेचा कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडला

Image
राहुरी नगरपरिषदेचा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला राहुरी : तहसील कार्यालयात ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत ३० हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी राऊत याने १ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदाराने याबाबत अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून राऊत याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.

अंकशास्त्रातून अंगशास्त्रात भोगू जोरात

Image
अंकशास्त्रातून अंगशास्त्राकडे   अंधश्रद्धेचा भयावह चेहरा श्रध्देचा बाजार। शिवाजी घाडगे भोगू कॅप्टन अशोक खरात चे बिग फोडणारा निरज जाधव याला पोलीसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे त्यामुळे भक्कम पुरावे  बरीच माहीती त्याच्या कडून पोलीसांना तपासात मिळेल. दरम्यान शिर्डी पोलीसांना देखील एस आय टी ने धारेवर धरले असून चाक निखळुन पडणार आहे.   नाशिकमधील बहुचर्चित भोगू बाबा अशोक खरात यांच्या कृत्यांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. स्वतःला अध्यात्म, अंकशास्त्राचा आव आणत त्यांनी भोळ्या-भाबड्या भक्तांची फसवणूक केली आणि त्याच वेळी स्वतः मात्र ऐशोआरामात जगत राहिला. त्यांच्या सान्निध्यात गेलेल्या अनेकांच्या आयुष्याचा चक्काचूर झाला; काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तर काहींच्या कथांनी समाज सुन्न झाला आहे. तब्बल ५८ महिलांवरील अत्याचारांच्या चित्रफिती पेनड्राइव्हमध्ये आढळल्याची माहिती धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात एका ऑफिस बॉयने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत विशेष तपास पथक  नेमण्यात आले असून तपास महिला अधिकाऱ्यांकडे स...

भोंदूगिरीवर घाव की श्रध्देचा बाजार

Image
 भोंदूगिरीवर घाव की व्यवस्थेची कसोटी? श्रध्देचा धंदा।शिवाजी घाडगे  नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आल्याने त्याचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. मात्र, या घटनेतून केवळ एका व्यक्तीचे कथित गैरकृत्य नव्हे, तर समाज, प्रशासन आणि अंधश्रद्धा या तिन्हींचा संगम स्पष्टपणे दिसून येतो. अशोक खरात याने अध्यात्म, ज्योतिष आणि मंत्र-तंत्राच्या माध्यमातून समाजात आपली प्रतिमा निर्माण केली. अनेक सुशिक्षित लोकही त्याच्या प्रभावाखाली गेले, हे वास्तव अधिक चिंताजनक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा किती धूसर झाली आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. लोकांच्या समस्यांवर त्वरित उपाय देण्याचे आश्वासन देत अशा व्यक्ती समाजात स्थान मिळवतात, हीच आपल्या विचारप्रणालीची कमजोरी आहे. या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचे काय झाले? ती तक्रार का दाबली गेली? तक्रारदारालाच दोषी ठरवून प्रकरण रफा-दफा करण्यात आले का? जर असे झाले असेल, तर ह...

श्रध्देआडचा अधपतन अंधश्रद्धेचा गैर फायदा

Image
अंधश्रद्धेच्या आडचा अधःपात थांबणार कधी? श्रध्देधंदा। शिवाजी घाडगे  नाशिकमध्ये उघडकीस आलेले तथाकथित नाटकातील नासका  ‘बाबा’ प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारे वास्तव आहे. स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणून मिरवणारे काही भोंदू लोक, अंधश्रद्धा आणि आंधळ्या भक्तीचा आधार घेत लोकांच्या श्रद्धेचे शोषण करत आहेत—आणि हे चित्र दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे. या प्रकरणातील आरोपीने ज्याप्रकारे महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार केले, त्यातून केवळ एका व्यक्तीची विकृती समोर येत नाही; तर समाजातील विश्वासाचा गैरवापर किती सहजपणे होऊ शकतो, हे स्पष्ट होते. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, अशा लोकांच्या संपर्कात समाजातील तथाकथित प्रतिष्ठित आणि प्रभावशाली मंडळीही असतात. त्यामुळे अशा भोंदूंचे ‘जाळे’ अधिक बळकट होत जाते. अलीकडच्या काळात पारनेर आणि आता नाशिकमधील घटना या अपवाद नाहीत, तर एक धोकादायक पॅटर्न आहे. कुणी ज्योतिष, कुणी तांत्रिक, तर कुणी ‘गुरू’ बनून लोकांच्या भावनांशी खेळ करत आहे. यात सर्वात मोठा बळी ठरतो तो सामान्य, भोळाभाबडा नागरिक—विशेषतः...

राहुरी पोटनिवडणूकीतील सर्व्हेने धाकधूक कोणाची वाढवली

Image
राहुरी पोटनिवडणुक सर्वेक्षणाने धाकधूक नेमकी कोणाची  वाढवली   रंग तंरग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅक्टर पंकज आशिया यांनी देखील सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत तसे अधिकृत रित्या जाहीर केले  सर्व साधारण उमेदवारास निवडणूक लढवण्या साठी रुर10000 अनमात रक्कम असून अनुसूचित जाती जमाती साठी रु5000 अनामत आहे राहुरी, नगर तालुका, पार्थडी तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत  दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार कोण असेल, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका...

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आचारसहिता लागू-डाॅक्टर पंकज आशिया

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : मतदारसंघाच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू  - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया     भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली असून मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.   यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीसाठीची अधिसूचना ३० मार्च २०२६ रोजी जारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ७ एप्रिल रोजी होईल, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. मतदान २३ एप...

अन्न सुरक्षा सह कृषी संशोधन म्हत्वाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Image
अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा  घाडगे न्यूज।राहुरी  जगातील एका भागात घडणाऱ्या युद्ध व संघर्षांचा परिणाम आज संपूर्ण जगावर होत असल्याने प्रत्येक देशाने आपली कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपाययोजना, नवउद्योग (स्टार्टअप) आणि शाश्वत शेती पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठ  चे कुलपती जिष्णू देव वर्मा  यांनी केले.आयोजित ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे , राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील   तसेच कृषिमंत्री ...

धुळीत हरवले प्रश्न की नवे राजकीय समीकरणे

Image
 धुळीत हरवलेले प्रश्न की नवे राजकीय समीकरण? रंग तरंग घाडगे न्यूज  ।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. देशातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने   राहुरी मतदारसंघाचाही त्यात समावेश केला आहे. कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे राहुरीत राजकीय हालचाली, आरोप-प्रत्यारोप आणि रणनीतींची चुरस पाहायला मिळणार हे निश्चित आहे. योगायोग असा की पोटनिवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीतच होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच हवेत उडालेली धूळ खाली बसण्याआधीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारणात शक्यता आणि अशक्यता यांची सीमा फारच पातळ असते, हे खरे असले तरी लोकशाही व्यवस्थेत बिनविरोध निवडणूक ही अपवादात्मक गोष्ट असते. कारण निवडणूक लढव...

राहुरी व बारामती विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी

Image
राहुरी व बारामती पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाडगे न्यूज| प्रतिनिधी राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र, निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी राहुरी  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभानिमित्त ते उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता काही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका देखील सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र, लोकशाही प्रक्रियेचा आदर ...

मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पदवी

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवीचा बहुमान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सन्मान घाडगे न्यूज । प्रतिनिधी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’  ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी सकाळी १० वाजता हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार असून राज्याच्या प्रशासनात तसेच विकासाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव केला जात आहे. सन १९६९ मध्ये स्थापन झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील अग्रगण्य कृषी शिक्षण व संशोधन केंद्र आहे. शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्ताराच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांमधील शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या वतीने दर दोन वर्षांनी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात कृषी व इतर शाखांतील पदवीधरांना राज्यपाल तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पदव्या...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल; राहुरी पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला यह भगवा रंग | शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. दरम्यान, राहुरी नगरपालिकेचे नियोजित कार्यक्रम रद्द करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक मुंबईकडे धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून यह भगवा रंग ची जोरदार चर्चा असून नेमका कोणावर कोणाच्या बाणाने पुन्हा विधानसभेत पोहोचणार  मुंबईतील विधानभवन परिसरात दुपारच्या सुमारास प्राजक्त तनपुरे विविध नेत्यांशी हस्तांदोलन करत आत्मविश्वासाने वावरताना दिसले. मात्र, येणारी निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवणार, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. आगामी काळात कोणते राजकीय डावपेच आखले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी राहुरी दौऱ्यात बोलताना या मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने युवा नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. भाजप युवा आघाड...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आता डॉक्टर

Image
मुख्यमंत्री फडणवीस होणार ‘डॉक्टर’ घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी (१५ मार्च) विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभात एकूण ४ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ हजार १८२ विद्यार्थ्यांना पदवी, ३४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, तर ७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात येणार आहे. तसेच ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून...

पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा गौरव

Image
पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा साई प्रतिष्ठानकडून स्नेह सत्कार      समाजातील विविध घटकांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या साई प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिन औचित्य साधून गुरुवारी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. समाजातील पडद्यामागे राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला. साई मंदिरात सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकार समाजासाठी दिवस-रात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विशेषतः त्यांच्या पत्नी कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असतात. या निस्वार्थ योगदानाची कदर म्हणून पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाची परंपरा साई प्रतिष्ठानने काही वर्षांपासून जपली आहे. पहिल्या वर्षी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या ...

तनपुरेची गुगली बदलतील राजकीय समीकरणे

Image
 तनपुरेंची ‘गुगली’ बदलतील राजकीय समीकरणे तंरग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  राहुरी मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे संपूर्ण राजकीय समीकरण ढवळून निघाले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पुत्र अक्षय कर्डिले यांच्या बाजूने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट ही भाजपसाठी मोठी राजकीय ताकद मानली जात होती. मात्र प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने या सहानुभूतीच्या लाटेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीपूर्वीच आपल्या नावाची चर्चा मतदारांमध्ये निर्माण करत तनपुरे यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. त्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी त्यांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरणात उत्सुकता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतील, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजी कर्डि...

राहुरी विधानसभा पोट निवडणूक राजकीय अंदाज

Image
राहुरी पोटनिवडणूक  राजकीय संकेतांचा अंदाज  रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे   राहुरी विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेली पोटनिवडणूक आता केवळ एक निवडणूक राहिलेली नाही, तर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे. या महिन्यातच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने सर्वच पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. राहुरी, नगर तालुका आणि पार्थेडी परिसरातील मतदारांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात तीन तालुक्यांच्या राजकीय समीकरणांचा प्रभाव दिसणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत मतभेद किंवा राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी नेतृत्वाशी समन्वय साधण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे भाजपही गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद ...

झोडपले तरी शान कायम ?

Image
झोडपले तरी शान कायम…? घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी शहरात अलीकडे घडलेल्या घटनेने कायदा, पोलीस यंत्रणा आणि लोकशाहीतील मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना शहरातून पायी फिरवत त्यांच्या तोंडावर काळे फडके बांधून धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि त्यानंतर शहरात चर्चेचे वादळ उठले. पोलीसांवर हल्ला करणे हे नक्कीच गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच जर हात उगारला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करताना कायद्याच्या चौकटीत राहणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. आरोपींची धिंड काढणे, त्यांना पायी फिरवणे किंवा सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक देणे हे कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा “दाखवण्याचा” प्रकार ठरतो, अशी टीका होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, आरोपींना न्यायालयात नेत असताना जर कोणत्याही नागरिकाने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर त्या अनर्थाची जबाबदारी कोणाची राहिली असती? पोलिसांकडे वाह...

राहुरीत पोलिसांवर हल्ला कायद्याचा धाक कमी झाल्याचा संकेत

Image
राहुरीत पोलिसांवर हल्ला; कायद्याचा धाक कमी झाल्याचे संकेत रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच सार्वजनिक ठिकाणी हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. या घटनेमुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. घटनेत जखमी झालेले पोलीस कर्मचारी विलास वैराळ यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांना अटक केली असून स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. मात्र या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असल्याने तपासाचे आव्हान अजूनही कायम आहे. या घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार अनेकांच्या उपस्थितीत घडल्याचे समोर येत आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाच अशा प्रकारे मारहाण होत असेल, त...

राहुरीत कायद्याची ऐसी तैसी पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Image
राहुरीत कायदा धाब्यावर : पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला विकास वैराळ यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न; ११ जणांवर गुन्हा राहुरी : राहुरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्यावर समाजकंटकांनी निर्घृण हल्ला करून गळा दाबत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात वैराळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर–मनमाड राज्य मार्गावर कंटेनर आणि स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून काही जणांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण सुरू केली होती. ही घटना पाहून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी पुढे येत चालकाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायदा हातात घेतलेल्या समाजकंटकांनी चालकाला वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच लक्ष्य केले. घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग मनात धरून आरोपींनी वैराळ यांच्यावर गज, काठ...

पाट पाणी उन्हाळी आवर्तन साठी अर्ज करा

Image
उन्हाळी सिंचनासाठी पाटाचे पाणी मागणी अर्ज करा  नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम २०२५–२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस तसेच फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी तसेच पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ मधील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उन्हाळी सिंचनासाठी पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी आणि आळंदी या धरणांच्या जलाशयांमधूनही पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्...

तोच जिव्हाळा उत्साह कायम पुण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ

Image
 जिव्हाळा कायम… दिघीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची स्नेहभेट राहुरी : नोकरीच्या बदल्या, जबाबदाऱ्या आणि काळाच्या ओघात अनेक नाती मागे पडतात; मात्र काही नाती अशी असतात की वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचा जिव्हाळा तसाच टिकून राहतो. पुणे येथील दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या राहुरीतील भेटीतून याच भावनेचा प्रत्यय आला. रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना प्रमोद वाघ यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून जुन्या मित्रांची स्नेहभेट घेतली. तब्बल नऊ वर्षांपूर्वी ते राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. बदली होऊन अनेक वर्षे उलटून गेली असली तरी राहुरीतील मित्रमंडळी आणि परिचितांशी असलेले त्यांचे स्नेहबंध आजही तेवढ्याच आत्मीयतेने जपले गेले आहेत. शिर्डीकडे जाताना राहुरीत थांबण्याचा त्यांचा निर्णय हा त्या आठवणींना आणि नात्यांना दिलेला मान असल्याचे मित्रांनी सांगितले. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रम...

बाबांनी तारले केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत

Image
बाबांनी ‘तारले’ केंद्रीय मंत्री रामदास आठवले  शिर्डीत रविवार विशेष।शिवाजी घाडगे  शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकेकाळी राजकारणाचा गंध नसलेले आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले भाऊसाहेब वाकचौरे खासदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. पंढरपूरमधून निवडून येण्याची अपेक्षा असताना शिर्डीतील हा पराभव आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हेही नगर दक्षिणमध्ये पराभूत झाले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केला होता. मात्र ते साध्य झाले नाही आणि अखेरीस पवार यांनी दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांना राज्यसभेची संधी दिली. यानंतर रामदास आठवले आणि दिवंगत शिवाजी कर्डिले हे दोघेही भाजपसोबत राजकारणात सक्रिय झाले. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत आठवले भाजपसोबत असले तरी ते सर्वच पक्षांना परवडणारे नेते मानले जातात. कार्यकर्त्यांना कोरे लेटरपॅड देऊन काम करण्याची संधी ...

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हातात लग्नांच्या बेड्या

Image
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे याच्या हातात लग्नांच्या बेड्या  घाडगे न्यूज।प्रतिनिधी   कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज कारवाईमुळे नगर जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे शनिवारी विवाहबंधनात अडकले. त्याच्या हातात लग्नांच्या  बेड्या अडकल्या संभाजीनगर येथील ‘सूर्या लॉन्स’ येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील  संतोष खाडे हे अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले अधिकारी आहेत. ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील मुलगा असलेल्या खाडे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर निवड मिळवली. सेवेत दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशिक्षण काळातच त्यांनी धाडसी व प्रभावी कारवायांमुळे स्वतःची वेगळी छाप उमटवली. गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी अल्पावधीतच जनतेत विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. खाडे यांच्या लग्नसोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्...

कृषी उत्पन्न वाढीस भारतीय स्त्री यांचे मोठे योगदान-डाॅक्टर सौम्या स्वामीनाथन

Image
कृषी उत्पन्न वाढीस भारतीय महिलांचे मोठे योगदान : डॉ. सौम्या स्वामीनाथन  राहुरी घाडगे न्यूज।प्रतिनिधी  शेतीत महिलांची वाढती भूमिका; तंत्रज्ञानाची जोड आवश्यक #*ग्रामीण भागात ८० टक्क्यांहून अधिक महिला शेतीत कार्यरत असल्याची माहिती #*महिलांच्या श्रम कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व इंटरनेट सुविधा आवश्यक #*स्मार्टफोनच्या मदतीने महिलांसाठी शेती अधिक सुलभ होणार #*महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ सुरू #*एकात्मिक शेती मॉडेलमुळे काही गावांचे उत्पन्न १.५ कोटींवरून ३.५ कोटींवर #*महिला शेतकऱ्यांचा ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पांतर्गत सत्कार -ग्रामीण भागातून शहरांकडे वाढत्या स्थलांतरामुळे शेतीत मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या शेतीतील श्रम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. महिलांना साक्षरतेबरोबरच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या स्मार्टफोनच्या मदतीने अधिक सक्षमपणे शेती करू शकतील. घरामध्ये अन्न तयार करण्याबरोबरच शेतात धान्य उत्पादनामध्येही महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन...

वाणीची मका अण बिबट्याची डरकाळी

Image
वाणी यांच्या मकेत बिबट्याचे दर्शन देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली वाणी यांच्या मकाच्या शेतात शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. शेतात काम करत असलेल्या महिलांसमोर बिबट्याने अचानक डरकाळी फोडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती समजताच प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढूस, मच्छिंद्र तांबे, विजय गव्हाणे, चंद्रकांत कराळे, गणेश भालके व दादा वाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्ञानेश्वर वाणी, दत्ता वाणी, ओम वाणी, साई वाणी, श्रीराम वाणी, सार्थक वाणी, अथर्व वाळके आदींनी फटाके फोडून बिबट्याला पळवून लावले. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी केली आहे.

वैज्ञानिक सत्यजित मुसमाडे युवकानसाठी आयडॉल

Image
 वैज्ञानिक सत्यजित मुसमाडे  युवकासाठी नवा आदर्श घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  भारताची प्रगती केवळ राजकारण, उद्योग किंवा अर्थकारणावर अवलंबून नसते; ती विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांवरही तितकीच अवलंबून असते. अशा वेळी छोट्या शहरातून एखादा तरुण देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेत पोहोचतो, तेव्हा तो केवळ एका कुटुंबाचा किंवा शहराचा अभिमान राहत नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. देवळाली प्रवरा येथील सत्यजित कृष्णा मुसमाडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये वैज्ञानिक म्हणून झालेली निवड ही अशीच अभिमानास्पद घटना आहे. इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर देशाच्या प्रगतीत थेट योगदान देण्याची मोठी जबाबदारी असते. भारताने गेल्या काही वर्षांत अंतराळ संशोधनात मोठी झेप घेतली आहे. चंद्रयान, मंगळयान आणि सूर्य मोहिमांसारख्या यशस्वी प्रकल्पांमुळे भारताचे नाव जगभरात गौरवाने घेतले जात आहे. अशा संस्थेत देवळाली प्रवरासारख्या शहरातील तरुणाची निवड होणे ही त्या शहराच्या बौद्धिक आणि शैक्षणिक क्षमतेची साक्ष देणारी बाब आहे...