Posts

Showing posts with the label कारवाई कोण करणार

बेशिस्त डम्पर मुळे आपघात वाढ

Image
राहुरी फॅक्टरी–कणगर रस्त्यावर खडी डम्परमुळे अपघात वाढले राहुरी।प्रतिनिधी  नगर–मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी चौक सध्या अपघातप्रवण मार्ग बनला आहे. मात्र, या गंभीर समस्येबाबत कोणीही बोलायला तयार नाही. बेशिस्त वाहतुकीला शिस्त कोण लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना हप्त्या पोटी रस्त्यावर लोक तडफडून मरत आहेत. बेशरम प्रशासनाला मात्र याचे काहीच सोयरसुतक नाही. सध्या कणगर खडी क्रशरवरून भरगच्च खडी भरलेले डम्पर भरधाव वेगात बेसुमार धावत असून, राहुरी फॅक्टरी चौक व ताराबाद चौफुली परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. डम्पर चालकांसाठी काही नियम आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभाग, आरटीओ व पोलीस प्रशासन सगळेच जणू मूग गिळून गप्प आहेत. लोक मरत असताना प्रशासन झोपेचे सोंग घेऊन सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. या रस्त्यावर शाळेच्या बसेस, स्थानिक वाहने, अतिक्रमण यामुळे आधीच वाहतूक कोंडी होते. त्यात निवडणुकीचे बॅनर्स परिस्थिती अधिकच अडचणीची करत आहेत. डम्पर चालकांना पायी चालणारे प्रवासी दिसत नाहीत काय? नियमाप्रमाणे किमान वेगमर्यादा पाळणे व डम्परला...