Posts

Showing posts with the label एम पी के व्हीत

अप्पर सचिव अनुप कुमार यांनी घेतला रब्बी हंगामाचा आढावा

Image
अप्पर मुख्य सचिवांनी घेतला रब्बी चा आढावा गतवर्षी जून महिन्यापासून आज अखेरीस पाऊसमान कमी असल्याने राज्यात रब्बीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. आगामी दिवसात पावसाची शाश्वती तेवढी राहिलेली नाही. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी असून भविष्याकरिता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे लागेल. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन करताना विविध रब्बी पीक पद्धतींचा अवलंब करावा लागेल. राज्यात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात  कृषी  विभागाच्या समन्वयाने रब्बी हंगाम नियोजन चर्चासत्र २०२३-२४ या कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना अनुप कुमार बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी कृषी विभागाचे विस्तार ...