मेडल्सचा बादशहा रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील
मेडल्सचा बादशहा : रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील साहस।शिवाजी घाडगे अहिल्यानगर येथील साहस, वेग आणि जिद्दीच्या जोरावर मोटारसायकल रेसिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे शरद काळे पाटील हे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या भेटी दरम्यान कार्यालयाच्या भिंतींवर झळकणाऱ्या विविध स्पर्धांतील विजयाची खुन मिरवणाऱ्या मेडल्स आणि सन्मानचिन्हांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक मेडलमागे संघर्ष, मेहनत आणि धाडसाची एक वेगळी कहाणी दडलेली असल्याचे जाणवत होते. दुचाकी रेसिंग हा अत्यंत धोकादायक आणि साहसी क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र, शरद काळे पाटील यांनी आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रेसिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेत अनेक पदके पटकावली आहेत. त्यामुळे त्यांना “मेडल्सचा बादशहा” अशी ओळख मिळाली आहे. शरद काळे पाटील यांच्या वेगाबाबत ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अवघ्या १ तास २० मिनिटां...