Posts

Showing posts with the label खेळाडु तयारील

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सहभाग नोंदवा

Image
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन सुब्रतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय 62 वी फुटबॉल कप सबज्युनियर,ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा १४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १७ वर्षाखालील मुले/मुली (ज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होत आहेत. व १४ वर्षाखालील मुले,मुली सबज्युनियर या वयोगटाच्या स्पर्धा बंगलुरु या ठीकाणी तर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व विभागस्तरावरील स्पर्धेचे आयोजन ३० जुलै २०२३ पूर्वी करण्याबाबत संचालनालयाने निर्देश दिले असुन जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा, महाविद्यालयांनी 12 जुलै, 2023 पर्यंत प्रवेशिका जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.   अहमदनगर जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत जे संघ सहभागी होणार आहेत अशा संघानी जिल्हास्तर स्पर्धेत सहभागापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तर स्पर्धेत ज्या शाळा,महा...