Posts

Showing posts with the label नवे बदल

भारत,जर्मनी,बेनीन यांत्रिकीकरण करार

Image
भारत-जर्मनी आणि बेनीन देशातील त्रिदेशीय सहकार्य करार संपन्न - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बेनीन देशामध्ये कृषि अवजारे, यंत्रे चाचणी व प्रमाणीकरण यंत्रणा उभारणीसाठी नुकताच महात्मा फुले कृषि विद्यापीठातील तज्ञांचा बेनीनला दौरा झाला. या दौर्याचे आयोजन जर्मन सरकारच्या जि.आय.झेड. या संस्थेमार्फत करण्यात आले होते. कोणतेही कृषी यंत्र विकसीत केल्यानंतर त्या यंत्राची चाचणी व प्रमाणीकरण ही प्रक्रिया करावी लागते. कृषि अवजारे व यंत्रे यांची चाचणी व प्रमाणीकरण करण्यासाठी भारतामध्ये वापरात असलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती कोटनौ बेनीन येथे पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अधिष्ठाता (कृषि अभियांत्रिकी) डॉ. दिलीप पवार, कृषि यंत्रे व शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे व कृषि यंत्रे व अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुलशीदास बास्टेवाड यांनी दिली. तसेच बेनीनमध्ये कृषी यांत्रीकीकरणाला चालना देण्यासाठी यंत्र प्रमाणीकरण यंत्रणा उभारणी करण्याबाबत सखोल चर्चा केली. या कार्यशाळेला बेनीन देशातील कृषी संशोधक, अवजारे उत्पादक, प्रमाणक अधिकारी, कृषी मंत्रालय अधिकारी आणि ...