लोकमान्य टिळक पुण्यतिथी माझ्या भाषणाची पहिली सुरुवात
लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनी माझ्या पहिल्या भाषणाचा जन्म -शिवाजी घाडगे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने माझ्या वक्तृत्वाची, लेखणीचा आणि जीवन प्रवासाची सुरवात झाली दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस देशभरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या आदराने साजरा केला जातो. अनेकांसाठी हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका महानायकाला अभिवादन करण्याचा असतो; पण माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व त्यापेक्षाही अधिक आहे. कारण हा दिवस माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारा दिवस आहे. आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वी, शालेय जीवनात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केलेले माझे पहिले भाषण हेच माझ्या वक्तृत्वाचा जन्म ठरले. त्या दिवशी मिळालेल्या टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आणि त्या टाळ्यांनीच माझ्यातील वक्ता, लेखक आणि पत्रकार घडविण्याची प्रक्रिया सुरू केली त्या वेळी मी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला व्यासपीठावर उभे राहण्याची भीती वाटली नाही स्वतःवर विश्वास...