Posts

Showing posts with the label संस्कारक्षम बना

देशाचे उज्वल भविष्य तरुणाच्या हातात:भाग्यश्री पाटील

Image
देशाचे भवितव्य तरूणांच्या हातात : न्या.भाग्यश्री पाटील महाविद्यालयांमध्ये विधी सेवा सहाय्य कक्ष  आपल्या देशात साधू-संतांची मोठी परंपरा आहे. साधू-संतांनी नितीमत्ता, सदगुण समाजातील प्रत्येक घटकांमध्ये रूजविले. समाजात या नितीमुल्यामुळेच सुख-शांती होती. पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिकमूल्याची घसरण, व्यसनाधिनता या सारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल यांनी केले. कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे मनोबल वाढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ...