अहिल्यानगर चे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून संजय मस्के
अहिल्यानगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारीपदी संजय मस्के यांची नियुक्ती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी अहिल्यानगरचे नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. बिड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून त्याच्या कडे चार्ज होता जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची नवी मुंबई येथे बदली झाल्यानंतर संजय मस्के यांची अहिल्यानगर येथे बदली झाली आहे संजय मस्के यांनी आपल्या सेवाकाळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषतः जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रंथालय संचालनालयात त्यांची ओळख "वास्तुशिल्पकार अधिकारी" अशी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सुमारे आठ जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालयाच्या नव्या इमारतीचे कामही त्यांच्या नेतृत्वाखाली गती घेऊन लवकर पूर्ण होईल आणि वाचकांना सुसज्ज, आधुनिक ग्रंथालय उपलब...