उच्च वंशावळीच्या गायी तयार -कुलगुरु पाटील
उच्च वंशावळीच्या देशी गायी तयार करण्यासाठी भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून राहुरी परिसरातील खडांबे येथील संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यात संकरित गायीपोटी जन्मलेल्या उच्च वंशावळीच्या सहिवाल कालवडीची पाहणी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केली. शेतकर्यांशी संवाद साधतांना कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्र भारतातील एकमेव असे केंद्र आहे की ज्याठिकाणी विविध दुधाळ देशी गायी गीर, सहिवाल, थारपारकर, राठी, रेड सिंधी यांची दुधाची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र काम करत आहे. शेतकर्यांनी आपल्या हवामानात तग धरणार्या व रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या दुधाळ देशी गायींचे संगोपन करणे गरजेचे आहे. देशी गायींचे शेण, गोमुत्र व दुध उच्च गुणवत्तेचे असून सध्याच्या काळात कॅन्सरसारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यासाठी अॅन्टीबायोटिकमुक...