Posts

Showing posts with the label तेरा वर्षांपासून भरती नाही

विद्यापीठातील सेवानिवृत्त कार्यकाल 65 ?

Image
कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे ? विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे  एकीकडे तरुणांना नोकरया नाहीतर दुरीकडे बुजुर्ग आपली जागा सोडायला तयार नाही विद्यापीठातुन बाहेर जायचे नसेल तर स्मशान भुमी बाधने देखील गरजेचे झालेय असेच म्हणावे लागेल  गेली तेरा वर्ष झाले उच्च शिक्षित तरुण भरती कडे डोळे लावून बसले आहेत मात्र त्याचा विचार करायला वेळ कोणाला आहे  राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी झुंजत आहे, त्याच्यासमोर हवामान बदलाचे संकट आ वासून उभे आहे. याचा सामना करण्यासाठी राज्यातील कृषि विद्यापीठांनी अत्याधुनिक काल सुसंगत संशोधन करून कात टाकण्याची गरज आहे. परंतु, कृषि विद्यापीठातील शिक्षण व संशोधनाचा गाडा केवळ ४५ टक्के प्राध्यापक हाकत आहेत. गेल्या तेरा वर्षांपासून शासनाने शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांचे निवृत्ती वय वाढवण्याचा घाट घालून जुन्याच लोकांना वारंवार संधि दिली जात आहे. २०१५ पूर्वी कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे होते. एप्रिल २०१५ मध्ये त्यात वाढ करून सेवानिवृत...