राष्ट्रांसाठी मध्यस्थी ही मोहीम न्यायालयात राबवणार
राष्ट्रासाठी मध्यस्थी” मोहिमेचे न्यायालयात आयोजन उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये “राष्ट्रासाठी मध्यस्थी” हि विशेष मध्यस्थ मोहीम सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात, नुकसान भरपाई, चेक बाउन्स १३८ ची प्रकरणे, वाटपाचे दावे, वाणिज्यिक दावे व सर्व प्रकरणे तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे विशेष मध्यस्थी मोहीमद्वारे मध्यस्थ प्रक्रियेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मध्यस्थी आणि सामांजस्य प्रकल्प समिती (Mediation and Conciliation Project Committee) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच अंजू शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाने “राष्ट्रासाठी मध्यस्थी” हि विशे...