राहुरी विधानसभा पोट निवडणूक राजकीय अंदाज
राहुरी पोटनिवडणूक राजकीय संकेतांचा अंदाज रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेली पोटनिवडणूक आता केवळ एक निवडणूक राहिलेली नाही, तर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे. या महिन्यातच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने सर्वच पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. राहुरी, नगर तालुका आणि पार्थेडी परिसरातील मतदारांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात तीन तालुक्यांच्या राजकीय समीकरणांचा प्रभाव दिसणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत मतभेद किंवा राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी नेतृत्वाशी समन्वय साधण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे भाजपही गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद ...