भारतीय कृषि अनुसंधान परिषदचे महात्मा फुले कृषि विद्यापीठास उत्कृष्ठ मानांकन
महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अधिस्वीकृती मंडळाकडून “उत्कृष्ट” मानांकन भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या 37 व्या बैठकीमध्ये सन 2023 ते सन 2028 या पाच वर्षांसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळाली असून विद्यापीठास ‘ए’ ग्रेड/उत्कृष्ट मानांकन दिले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठास व त्या अंतर्गत येणार्या विविध महाविद्यालयांना पाच वर्षासाठी अधिस्वीकृतीसह ‘ए’ ग्रेड/उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने दिलेल्या ‘ए’ ग्रेड मानांकन मिळाल्यामुळे मनस्वी आनंद होत आहे. विद्यापीठाचे अपुरे मनुष्यबळाच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे मानांकन मिळाल्याचे मोठे समाधान आहे. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्य करणारे शिक्षक आणि शास्त्रज्ञ अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत. डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, मफुक...