जिल्हा बँक निवडणुकीत 14 हरकती
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९०३ उमेदवारी अर्ज; १४ हरकती दाखल अहिल्यानगर । प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलीच रंगत आली असून, तब्बल ९०३ उमेदवारी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार राहुल जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे व मोनिका राजळे यांच्या उमेदवारी अर्जांवरही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या या बँकेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. बँकेच्या माध्यमातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पाहुणे-माहुणे, पक्ष-सोयरे-धायरे यांचे राजकारणही पाहायला मिळत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून, मंगळवारी विविध मतदारसंघांतील उमेदवारी अर्जांवर एकूण १४ हरकती ...