लोणीत जलसंपदा चा खेळ रंगणार
लोणीत जलसंपदा खेळ रंगणार घाडगे न्यूज।प्रतिनिधी जलसंपदा विभागाच्या वतीने शनिवारी ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी क्रीडामय होणार आहे. निमित्त मात्र पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे खेळात सशक्त, सेवेत समर्थ हे ब्रीदवाक्य घेऊन होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी खेळाच्या मैदानात आपले कसब पणाला लावणार आहेत. दरवर्षी होणाऱ्या यजमानपद यंदा अहिल्यानगर जिल्ह्याकडे आले असून, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने स्पर्धेची तयारी केली आहे. दिमाखदार उद्घाटन सोहळा स्पर्धेचे रणशिंग शनिवारी सकाळी ९ वाजता फुंकले जाईल. लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या क्रिंडागणावर दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडेल. या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते व भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो-खो पटू श्वेता गवळी व बेसबॉल पटू अक्षय आव्हाड खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी हजेरी लावतील. राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्...