राहुरी विधानसभा से पोटनिवडणूक साठी जाहीर प्रसिध्दी पूर्व मंजुरी आवश्यक
राहुरी पोटनिवडणूक साठी राजकीय जाहिरातींसाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक प्रतिनिधी- राहुरी विधान संभा पोट निवडणूक साठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे, केबल नेटवर्क, सोशल मीडिया तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण समितीची पूर्व मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मुद्रित माध्यमांमध्येही मतदानाच्या दिवशी व त्याच्या आधीच्या कालावधीत जाहिरातींसाठी विशेष नियम लागू असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली. राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण समिती सदस्य व माध्यम कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे, पत्रकार तथा समिती सदस्य महेश देशपांडे, पोलीस निरीक्षक सुदाम काकडे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, माहिती अधिकारी अमोल महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित फेक न्यूज व द्वेषप...