Posts

Showing posts with the label कृषीपर्व

आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Image
आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल - पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव   घाडगे न्यूज। प्रतिनिधी   आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी व महिला सक्षमीकरण या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. त्यातूनच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना व बाजारपेठेच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा ‘कृषीपर्व’ हा उपक्रम शेतीच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्स्पो इंडियन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’चा शुभारंभप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि...