Posts

Showing posts with the label लवकर ये

अशील तेथुन परत फिर

Image
लव्ह जिहादच्या मार्गावरील मुलीस पित्याचे पत्र माझ्या हृदयस्थ बाळा, तारुण्यातील भावजीवन भरतीच्या लाटेप्रमाणे असते. बुध्यांक (IQ) कितीही कमी असला तरी भावनांक (EQ) शिखरावर पोहोंचलेला असतो. जेंव्हा शरीरातील ग्रंथी हार्मोन्स स्रवू लागतात, तेंव्हा कामभावना आतून धक्के देऊ लागते. भावनेला प्रेमाचे पंख फुटतात, तेंव्हा नकळत पुरुष देहाचे आकर्षण वाटू लागते. सिनेमा, सिरियल व साहित्य मनाला आकार व दिशा देत असते. या संवेदनशील वयात माता पित्याने निरोगी, निकोप व स्पष्ट संवाद करणे गरजेचे असते. पण आम्ही इथे कमी पडलो. शरीरसंबंध, प्रेम, विवाह या विषयावर मुलीशी बोलायचे नाही, या परंपरेचे आम्ही पालन करीत होतो. प्रत्येक आईबापाला आपले बाळ लहान आहे, असाही भ्रम असतो. शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, परदेशातील शिक्षण हेच श्रेष्ठ ज्ञान आहे व त्या मार्गाने जाणे म्हणजेच प्रगती, असे आम्ही समजत गेलो. आपल्या धर्माचे व भाषेचे संस्कार करण्याचे मात्र विसरुन गेलो. आज त्याची किती मोठी किमत मोजावी लागते आहे, हे तुम्हाला कळणार नाही. शाळेतील गुणपत्रक, पदवी - पदाचे कौतुक व मिळकतीची प्रतिष्ठा मिरविण्यातच आमची मती...